गोवर
गोवर गोवर हा गोवर विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात आणि ती ७ ते १० दिवसांपर्यंत टिकतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप येतो. हा बहुतेक वेळा ४० °से (१०४ °फॅ) पेक्षा जास्त असतो, तापाशिवाय खोकला, वाहणारे नाक आणि डोळ्यांची जळजळ या लक्षणांचा समावेश होतो. कोप्लिकचे स्पॉट्स म्हणून ओळखले जाणारे लहान पांढरे डाग लक्षणे सुरू झाल्याच्या दोन किंवा तीन दिवसांच्या नंतर तोंडामध्ये तयार होऊ शकतात. लक्षणे सुरू झाल्याच्या तीन ते पाच दिवसांनंतर लाल, सपाट पुरळ बहुधा चेहऱ्यावर येतो आणि नंतर उर्वरित शरीरावर पसरणे सुरू होते. बळावलेल्या गोवरामुळे कधीकधी अतिसार (८% प्रकरणांमध्ये), मध्य कर्ण संसर्ग (७%) आणि न्युमोनिया (६%) होऊ शकतो. हे काही प्रमाणात गोवर-प्रेरित इम्युनोसप्रेशनमुळे उद्भवते. क्वचित फेफरे , अंधत्व किंवा मेंदूची जळजळ होण्याची शक्यता असते. इतर नावांमध्ये मॉरब...