Posts

गोवर

Image
गोवर गोवर  हा  गोवर विषाणूमुळे  होणारा एक अत्यंत  संसर्गजन्य रोग  आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात आणि ती ७ ते १० दिवसांपर्यंत टिकतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये  ताप  येतो. हा बहुतेक वेळा ४० °से (१०४ °फॅ) पेक्षा जास्त असतो, तापाशिवाय खोकला,  वाहणारे नाक  आणि  डोळ्यांची जळजळ  या लक्षणांचा समावेश होतो.  कोप्लिकचे स्पॉट्स  म्हणून ओळखले जाणारे लहान पांढरे डाग लक्षणे सुरू झाल्याच्या दोन किंवा तीन दिवसांच्या नंतर तोंडामध्ये तयार होऊ शकतात. लक्षणे सुरू झाल्याच्या तीन ते पाच दिवसांनंतर लाल, सपाट पुरळ बहुधा चेहऱ्यावर येतो आणि नंतर उर्वरित शरीरावर पसरणे सुरू होते. बळावलेल्या गोवरामुळे कधीकधी  अतिसार  (८% प्रकरणांमध्ये),  मध्य कर्ण संसर्ग  (७%) आणि  न्युमोनिया (६%) होऊ शकतो. हे काही प्रमाणात गोवर-प्रेरित इम्युनोसप्रेशनमुळे उद्भवते. क्वचित  फेफरे ,  अंधत्व  किंवा  मेंदूची जळजळ  होण्याची शक्यता असते. इतर नावांमध्ये मॉरब...

डांग्या खोकला

डांग्या खोकला डांग्या खोकला  हा  संसर्गजन्य रोग  आहे.  बोर्डेटेला पेर्तुसिस नांवाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणाऱ्या थेंबावाटे हा विषाणू पसरतो, रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणा-या पातळ पदार्थाचा स्पर्श झाल्यानेदेखील हा रोग पसरतो. लक्षणे  संसर्गानतर सात ते दहा दिवसांत रोग-लक्षणे दिसू लागतात. पहिल्या अवस्थेत सर्दी, पडसे व थोडा ताप असतो. नंतर पाच-सात दिवसांनी दुसरी अवस्था सुरू होते. खोकला येऊ लागतो. प्रथम खोकला कोरडा असतो. पुढे खोकल्याच्या उबळी सुरू होऊन श्वास आत घेताना. 'हुप' असा आवाज येतो. म्हणून यास माकडखोकला असे म्हणतात. उबीच्या शेवटी चिकट कफ पडतो. कधी कधी कफ परत घशात जाऊन तो गिळला जातो. कधी कधी उलटी होते. उबळी दररोज पंधरा वीस अगर जास्तही वेळा येतात. उबळीच्या जोराने चेहरा लाल होतो. नाकातून एखादे वेळी रक्तस्त्राव होतो. कोणाकोणाच्या डोळ्यात रक्त उतरते. अशक्त रोग्याला खोकला झाला तर तो बरा होणे कठीण असते. या विकारात ताप येऊन न्युमोनिया होऊन मूल दगावण्याची शक्यता असते. तिसऱ्या अवस्थेत उबळी कमी होत जाऊन रोगी बरा होतो. प्...

रेबीज

Image
रेबीज रेबीज  हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो. रेबीज ---- रेबीजची लागण झालेला कुत्रा लक्षणे संपादन करा रेबीजचा पेशंट, १९५९ साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झ...

चिकुनगुनिया

Image
चिकुनगुनिया चिकुनगुनिया  हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले. लक्षणे संपादन करा एडीस इजिप्ती डास ताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत. चिकनगुनियाची लक्षणे जरी  डेंग्यूसारखी  असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात त्यात जवळजवळ कधीच दिसत नाही. त्यामुळे चिकुनगुनियामुळे सहसा मृत्यू ओढवत नाही. संबंधित लेख गालफुगी रेबीज इंफ्लुएंझा

गालफुगी

Image
गालफुगी गालफुगी झालेला मुलगा गालगुंड, गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा व्याधी असून जगामधे सर्वत्र आढळतो. ह्या व्याधीमध्ये रोग्याच्या लाळग्रंथी ( Parotid Glands ) अचानक सुजतात. साधारणतः शिशीर व वसंत ऋतुमधे गालगुंड, गालफुगी रोगाची साथ येते. गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अधिक प्रमाणात आढळतो. परंतु कुठल्याही वयांमधे याची लागणं होऊ शकते. बालकांपेक्षा प्रौढ व्यक्तीमधे व्याधीची गंभीर लक्षणे निर्माण होतात. ९ महिण्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना हा व्याधी सहसा होत नाही. स्त्रियाच्या तुलनेने पुरुषामधे गालगुंड, गालफुगी रोग अधिक प्रमाणात होतो. एकदा हा व्याधी होऊन गेल्यानंतर सहसा पुनः होत नाही. कारण त्या रोग्याच्या शरीरात ह्या व्याधीविरुद्ध प्रतिकार शक्ति निर्माण होते. मोठया शहरामधे हा व्याधी जास्त प्रमाणात पसरतो. वर्णन संपादन करा झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो...